मंगळवार, २७ डिसेंबर, २०२२

संपत्ती संचय

उत्तर प्रदेशात एकाच व्यक्तीकडे अडीच शे कोटींपेक्षा जास्त रोख सापडली. महाराष्ट्रात पण वेगवेगळी सुमारे तेवढीच रक्कम सापडली. अशा बातम्यात नवीन काही राहिलेले नाही. शिवाय शेकडो वा हजारो कोटी रुपये संपत्तीचे मालक असल्याच्या बातम्या असतातच. ताज्या दोन बातम्या वाचताना मनात सहज दोन गोष्टी आल्या -

१) अतिशय बदनाम झालेल्या भारताच्या जुन्या आर्थिक व्यवस्थेत एक व्यक्ती अनेक व्यवसाय करू शकत नव्हती. त्यामुळे खरे खोटे व्यवसाय, उद्योग दाखवून संपत्तीचे असे केंद्रीकरण किंवा संचय यांची शक्यता नव्हती. आजच्या समस्यांच्या संदर्भात जुन्याचे विश्लेषण व्हायला नको का? (ज्यांना लगेच जातीयवाद वगैरे आणायचा असेल त्यांनी डॉ. आंबेडकर यांचे मुंबई विधिमंडळातील खोत कायद्यावरील भाषण वाचावे.)

२) शारीरिक श्रम करणाऱ्यांनाच मतदानाचा अधिकार राहावा अशी सूचना महात्मा गांधी यांनी केली होती. आजच्या crony capitalism च्या छायेत त्याचा साधकबाधक विचार व्हावा का?

- श्रीपाद कोठे

२८ डिसेंबर २०२२