गुरुवार, ६ जानेवारी, २०२२

आनंद

आनंद या शब्दाला विरुद्धार्थी शब्दच नाही.

- एखादा सुखी असतो कारण त्याला त्यातून आनंद मिळतो.

- एखादा दु:खी असतो कारण त्याला त्यातून आनंद मिळतो.

- एखादा मदत करतो कारण त्याला त्यातून आनंद मिळतो.

- एखादा लुबाडतो कारण त्याला त्यातून आनंद मिळतो.

- एखादा प्रेम करतो कारण त्याला त्यातून आनंद मिळतो.

- एखादा द्वेष करतो कारण त्याला त्यातून आनंद मिळतो.

- एखादा समजूतदारपणे वागतो कारण त्याला त्यातून आनंद मिळतो.

- एखादा सूडबुद्धीने वागतो कारण त्याला त्यातून आनंद मिळतो.

- एखादा मित्रत्व करतो कारण त्याला त्यातून आनंद मिळतो.

- एखादा शत्रुत्व करतो कारण त्याला त्यातून आनंद मिळतो.

- एखादा निस्वार्थ असतो कारण त्याला त्यातून आनंद मिळतो.

- एखादा स्वार्थी असतो कारण त्याला त्यातून आनंद मिळतो.

प्रत्येक गोष्टीच्या, कृतीच्या, विचाराच्या मुळाशी आनंद असतो. आनंदम ब्रम्ह इति.

- श्रीपाद कोठे

७ जानेवारी २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा