बुधवार, ५ जानेवारी, २०२२

हायड्रोजन बॉम्ब

उत्तर कोरियाने आज हायड्रोजन बॉम्बचं परीक्षण केलं आणि जग हादरलं. दुसरं महायुद्ध संपायला ७० वर्ष झाली आहेत. जग तिसऱ्या जागतिक महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे का? किम-जोंग-उन २१ व्या शतकातील हिटलर ठरेल का? द्वितीय महायुद्धानंतर अफाट भौतिक, वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगती केल्यानंतर; मानसशास्त्रे आणि वर्तनशास्त्रे यांचे नवनवीन सिद्धांत प्रतिपादन केल्यानंतर; व्यवस्थापनशास्त्र आणि मानव्यशास्त्रे अत्याधुनिक झाल्यानंतर देखील; जगाची जगविषयक मुलभूत जाण शून्याच्या आसपासच घुटमळते आहे का? उद्या `खुदा न खास्ता' युद्ध सुरु झालं आणि त्यात हायड्रोजन बॉम्ब वापरण्यात आले तर आमच्या खऱ्या-खोट्या समस्या, प्रश्न, वेदना-संवेदना यांच्यासाठी काही जागा तरी उरेल का? हायड्रोजन बॉम्बच्या chain reaction मधून ५ कोटी अंश सेल्सिअस तापमान उत्सर्जित होतं. उन्हाळ्यात ५० अंश सेल्सिअस तापमान झालं की पक्षी मरू लागतात. संभाव्य धोका लक्षात घेऊन, मुळांची जोपासना अन त्यासाठी मुळांची ओळख करून घेण्याची तसदी जग आता तरी घेईल का? शक्यता कमीच आहे.

- श्रीपाद कोठे

६ जानेवारी २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा