मंगळवार, ११ जानेवारी, २०२२

थोडं वेगळं -

- इस्लाम आणि ख्रिश्चन संप्रदाय आपल्या जन्मस्थानातून निघाले आणि अल्पावधीतच त्यांनी खूप मोठे भूभाग त्यांच्या रंगात रंगवले.

- भारतात मात्र त्यांना हे शक्य झाले नाही.

- जे त्यांच्या रंगात रंगले ते मोठे, सामर्थ्यवान होते किंवा लहान, दुबळे होते. मात्र एक होते. त्यांच्यात एक monolithic एकता होती. उदा. - पर्शिया, ग्रीस, रोम.

- भारतात monolithic एकता नव्हती. भारत मात्र त्यांच्या रंगात रंगला नाही.

- जगातील अन्य देश/ समूह/ संस्कृती/ राज्ये यांनी जेवढं गमावलं (वास्तविक ते पूर्णच संपले) तेवढं भारताने गमावलं नाही.

- एखादी सुनामी यावी आणि तिने काही घेऊन जावं तेवढंच भारताने गमावलं.

..............

निष्कर्ष आपापले काढावेत.

...............

ज्या ज्या थोरांनी एकतेचा उपदेश केला आहे त्यातील प्रत्येकाला वेगवेगळा अर्थ अभिप्रेत आहे.

..................

केवळ डोक्याला काम (प्रामाणिक आणि कळकळीचे) म्हणून पोस्ट.

- श्रीपाद कोठे

१२ जानेवारी २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा