मंगळवार, ४ जानेवारी, २०२२

ईश्वर

श्री. अतुल सोनक जी,

ईश्वर संकल्पनेवर लवकर लिहावे अशी विनंती तुम्ही केली आहे. लिहिणार आहेच. पण केव्हा लिहिले जाईल सांगणे कठीण आहे. तूर्त एवढेच म्हणेन की-

१) ईश्वर ही स्वतंत्र व्यक्ती वा शक्ती असून तिने हे जग निर्माण केले अन त्यात माणूस निर्माण करून त्याच्याकडे उपभोगासाठी हे सोपवले ही भारतेतर कल्पना आहे.

२) भारतीय कल्पनेनुसार ईश्वर ही स्वतंत्र व्यक्ती वा शक्ती नाही आणि त्याने हे जग निर्माणही केलेले नाही. हे जग म्हणजे सृजन नाही, manifestation आहे. ईश्वर स्वत:च या ब्रम्हांडरुपात अभिव्यक्त झाला आहे. म्हणून अस्तित्वात जर काही असेल तर तो फक्त ईश्वरच आहे. `ईश्वर म्हणजे संपूर्ण अस्तित्वाची गोळाबेरीज.' god is the sum total of the whole existence.

3) भारतात आध्यात्मिक साधनेचे विविध मार्ग आहेत. त्यातील भक्तिमार्गात फक्त ईश्वर prominently आहे. अन्यत्र गौण आहे. योगमार्गात तर नाहीच म्हटले तरीही चालेल. भक्तीमार्गात सुद्धा वेगळ्या व्यक्ती वा शक्ती रूपातील ईश्वर कल्पना प्रारंभिक म्हणून आहे. भक्तीच्या उच्चतर अवस्थात हळूहळू स्वतंत्र ईश्वर कल्पनेचा लय होत जातो. परा भक्तीत तर भक्त-भक्ती-भगवान एकच होतात.

- श्रीपाद कोठे

५ जानेवारी २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा