मंगळवार, ४ जानेवारी, २०२२

कुत्रा मांजर

वस्तीतल्या सीआयडीने सांगितले, अमक्यांच्या घरी कुत्रा आणि मांजर छानपैकी एकत्र खातात, पितात, उठबस करतात, लाडवतात... वगैरे. म्हटलं आश्चर्यच आहे. कुत्रा अन मांजर एकमेकांचे वैरीच जणू काही. मांजर दिसली की कुत्रा धावणारच आणि कुत्रा दिसला की मांजर पळणारच. म्हटलं- पाळले असतील अन त्यांना सवय लावली असेल. त्यावर सीआयडी चं उत्तर- नाही, पाळलेले नाही. जातायेताना समजा प्राण्यांनी एकमेकांचं उष्ट खाल्लेलं असेल तर त्यांची अशी मैत्री होते. मग ते आपसात मिळूनमिसळून राहतात. वा !!! काय नामी उपाय आहे ना वैर मिटवण्याचा. माणसांचं असं होऊ शकतं का?

- श्रीपाद कोठे

५ जानेवारी २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा