शनिवार, १५ जानेवारी, २०२२

माळ्याने सांगितले-

एक काका आहेत. त्यांच्या दोन्ही शेजाऱ्यांशी त्यांचे भांडण होत असते. एकाशी होते, त्यांचे प्रत्येक गोष्टीकडे लक्ष असते म्हणून. अन दुसऱ्याशी होते, त्यांचे कोणत्याच गोष्टीकडे लक्ष नसते म्हणून. म्हणजे नवीन कपडे घालणे, छान फुले लागणे, पाहुणे येणे, दारी येणारे आगंतुक- विक्री करणारे लोक; असे कोणतेही विषय. एकाचे प्रत्येक गोष्टीकडे लक्ष अन त्यावर प्रतिक्रिया, बोलणे, विचारणे वगैरे. या काकांना त्याचा राग येतो. दुसरे शेजारी कोणत्याच गोष्टीकडे लक्ष देत नाहीत. काकांना त्याचाही राग येतो. अन कधी कधी त्यावरून भांडण, वाद, त्रागाही.

आहे नं मानवी स्वभावाची गंमत.

- श्रीपाद कोठे

१६ जानेवारी २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा