मालदा, पूर्णिया, इंदोर येथील घटना गंभीर आहेतच. पण काल `सुदर्शन न्यूज'च्या स्टुडीओत जो प्रकार झाला तो तर फारच चिंताजनक आहे. तिथे समूह नव्हता. त्यामुळेच mob psychology, mob mentality हे भाग नव्हते. चर्चा सुरु होती. त्या चर्चेत सहभागी झालेल्या एका मुफ्तीने प्रथम चर्चेत सहभागी अन्य एका व्यक्तीला अन नंतर त्या चर्चेचे संचालन करणाऱ्या मुलीला काय म्हणावे? ते म्हणाले- `मेरे मजहब पे कुछ कहा तो गला चीर डालुंगा. खिचते लेके जाऊंगा और कोर्ट मे चीर डालुंगा.'
धर्म, टीकाटिप्पणी, मस्करी, धार्मिक सुधारणा, धार्मिक चर्चा, धार्मिक परिवर्तन इत्यादींची साधकबाधक चर्चा होणे गरजेचे आहे. अपमान कोणता अन केव्हा आणि धार्मिक (पंथ, संप्रदाय या अर्थाने) तत्वज्ञान, रीतीरिवाज यांची चिकित्सा कोणती यावरही मंथन व्हावे. मुख्य म्हणजे हे मंथन केवळ हिंदू (ज्यात सनातनी, आर्य समाजी, अन्य पंथ-उपपंथ, शीख, जैन, बौद्ध) समाजापुरते मर्यादित नसावे, तर इस्लाम आणि ख्रिश्चन यांच्या संबंधातही असावे. जेवढ्या कर्कश्शपणे हिंदू समाजातील पंथ संप्रदायांचे विश्लेषण होते; तेवढ्याच कर्कश्शपणे इस्लाम आणि ख्रिश्चन पंथ संप्रदायांचे पण विश्लेषण व्हावे. अन्यथा वटवट बहाद्दरांनी मुग गिळून चूप बसावे.
अर्थात ही दीर्घ काळाची प्रक्रिया आहे. त्याआधी `सुदर्शन न्यूज'च्या स्टुडीओत मुफ्ती जे काही बरळला त्याचा निषेध व्हायला हवा. आमीर, शाहरुख, पुरस्कार वापसीवाले किंवा अन्य स्वनामधन्य बुद्धिवादी- विवेकवादी- वगैरेंनी याचा निषेध करावा. तेही फार दूरचे आहेत. मी माझ्या मित्र मैत्रिणींना अन फेसबुकवरच्या अन्य तमाम मंडळींना आवाहन करतो की त्यांनी `मी निषेध करतो/ करते' अशी प्रतिक्रिया या पोस्टवर द्यावी. पाहू या किती जणांमध्ये ही तरी हिंमत आहे. तथाकथित बुद्धिवादी- विवेकवादी- विचारशील- धर्मनिरपेक्ष- लोकांची मी आवर्जून वाट पाहीन. पाहू या त्यांची प्रामाणिकता अन पारदर्शिता. ते असे करू शकले नाहीत तर उघडे पडतील.
- श्रीपाद कोठे
८ जानेवारी २०१६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा