१) राज्य (शासन, प्रशासन) - समाजाच्या सुखसोयींची guarantee नाही.
२) नातीगोती - सुरक्षा, सुख, शांती यांची guarantee नाही.
३) पंथ, संप्रदाय - नैतिकता, आध्यात्मिकता यांची guarantee नाही.
४) स्वातंत्र्य - व्यक्तीच्या, देशाच्या प्रगतीची guarantee नाही.
५) शेती, उद्योग, सेवा - समाजाच्या विकासाची guarantee नाही.
६) शिक्षण, संस्कार - सुसंस्कृतपणाची guarantee नाही.
७) सैन्य - सुरक्षेची guarantee नाही.
८) वैद्यकीत सेवा, ज्ञान - आरोग्याची guarantee नाही.
९) संस्था, संघटना - सामाजिक स्वास्थ्य व सुधारणांची guarantee नाही.
हे सगळे मार्ग आहेत, साधनं आहेत. आपण त्यांना guarantee समजतो अन मग गोंधळ माजतो. मग एखाद्या मातेने आपल्या अपत्यांनाच मारून टाकले की, आपण अस्वस्थ होतो. किंवा नात्यांच्या चौकटींचे चित्र विस्कटले की अस्वस्थ होतो. अनेक गोष्टींसाठी सरकारच्या नावाने बोटे मोडतो. किंवा राजकीय लोक तू-तू, मी-मी करतात. अनेकदा भांबावलेपण, गोंधळ, अस्वस्थता, निराशा, अगतिकता या गोष्टी पाहायला, अनुभवायला मिळतात किंवा आपणच त्यांची शिकार होतो. तेव्हा आपण साधनांना वा मार्गालाच guarantee समजून चाललेलो असतो. मार्ग वा साधनांनी अपेक्षित गंतव्यापर्यंत पोहोचण्यात अन्य अनेक बाबीही असतात. साधनांची गती, साधनांची स्थिती, त्यातील बिघाड, त्यांची दुरुस्ती, त्यांची देखभाल, साधने हाताळणारे चालक-वाहक, रस्त्यांची अवस्था, रस्त्यांवरील वळणे, फाटे, मिळालेला पत्ता, अशा अनेक बाबी अंतिम गंतव्य स्थानापर्यंत पोहोचण्यात भूमिका बजावत असतात.
आपल्यालाच त्रास होऊ नये यासाठी अन शेवटाला पोहोचण्यासाठी guarantee आणि मार्ग वा साधने यांची गल्लत होता कामा नये.
- श्रीपाद कोठे
६ जानेवारी २०१६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा