रविवार, २ जानेवारी, २०२२

प्रयत्नवाद

करणं आणि होणं यात फरक असतो. आपण एखादी गोष्ट करतो म्हणजे ती होतेच असे नाही. इंग्रजीत एक फार छान म्हण आहे - there is always a gap between a cup and a lip. मात्र प्रयत्न म्हणजे यश, करणे म्हणजे होणे; असा सिद्धांत मांडला की पंचाईत होते. तसं झालं की; कधी दंभ, कधी उन्माद, कधी अहंकार, निराशेकडे नेणारा आशावाद तयार होतात. अन प्रयत्न यशस्वी झाले नाही तर निराशा, वेदना, शून्यता तयार होतात. एकांगीपणा, आक्रोश, आवेश, आग्रहीपणा तयार होत जातात. एकमेकांना समजून घेणे, कोणाला काही समजावणे, संवाद अशा गोष्टींमधेही या सिद्धांतामुळे अडथळा येतो. सगळं perception बदलतं. दुबळेपणा येतो. व्यक्तिगत जीवनात आणि समूह जीवनात पण याचा पडताळा येऊ शकतो.

- श्रीपाद कोठे

३ जानेवारी २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा