अर्थव्यवस्थेची वाढ हे एक मिथक आहे. अर्थव्यवस्था चालत राहायला हवी हे योग्य आहे. त्यासाठी पैसा फिरत राहायला हवा हे तत्व सगळेच मान्य करतात आणि त्यासाठी प्रयत्नदेखील करतात. दुर्दैवाने हे प्रयत्न म्हणजे १०० कॅलरी जाळून नवीन २०० कॅलरी gain करण्यासारखे गमतीशीर आहेत. पैसा फिरण्यासाठी पैसा वाढवणे हा उपायच चुकीचा आहे. त्याने पैसा फिरत नाही साठत राहतो. पैसा फिरणे याचा अर्थच तो कधीतरी, कुठेतरी कमी होणे. कमी असेल तिथे वाढणे आणि जास्त असेल तिथे कमी होणे. आज कमी होणे याची कल्पना सुद्धा कोणी करत नाही. ती करणं क्रमप्राप्त आहे तरच मार्ग निघू शकतो. एकच ध्यानी असायला हवं की, पैसा कमी होण्याची ही क्रिया जगण्याला बाधा पोहोचवणार नाही. ती मर्यादा न विसरता प्रयत्न हवेत.
- श्रीपाद कोठे
८ जानेवारी २०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा