राजकारण जिथे हात लावेल तिथे बट्ट्याबोळ ठरलेलाच. भारतीय समाजाला राजकारणाने हात लावला अन रसातळाला जाण्याची प्रक्रिया सुरू झाली. राजकारणात सहभाग म्हणजेच देशभक्ती, म्हणजेच सामाजिक जबाबदारी इत्यादी इत्यादी इत्यादी इंग्रजांनी आमच्यात टोचले अन आम्हाला त्याचा संसर्ग झाला. एकीकडे गुरुकुल वगैरेची चर्चा आपण करतो अन विद्यापीठांना राजकारणाचे आखाडे करतो. शिक्षण काय अर्थकारण काय, कला काय, भाषा काय... सगळ्या गोष्टींची गाठ राजकारणाशी घालायची. सत्तेची शक्ती असल्याने भलं करण्याचे, कल्याण करण्याचे गाजर दाखवत सगळं नासवून टाकायचं हा राजकारणाचा धर्म आहे, अंगभूत गुण आहे. एका संस्कृत सुभाषितात तर राजकारणाला वारांगना म्हटले आहे. गांधीजींनीही हेच म्हटले होते. आज सगळ्या समाजाला राजकारणाच्या वारांगनेचं पिसं लागलं आहे. परिणाम वेगळा सांगण्याची गरजच नाही.
- श्रीपाद कोठे
७ जानेवारी २०२०
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा