बुधवार, २४ एप्रिल, २०१३

काहीतरी वेगळं, अन छानही

दिवस साजरे करण्याचे वेड आता जुने झाले आहे. हो-नाही करता करता अनेक जण आपापल्या पद्धतीने हे दिवस साजरेही करू लागले आहेत. एक valentine day सोडला तर अन्य दिवसांना विरोध वगैरेही होत नाही. असाच एक day नुकताच झाला. तो म्हणजे mother 's day. माझा एक भाचा आहे. वय वर्षे १८. त्यानेही हा mother 's day साजरा केला. केक आणला, शुभेच्छा पत्र आणलं, भेटवस्तू आणली. सगळं साग्रसंगीत. यात नवीन तर काहीच नाही. मग तरीही मी हे का सांगतो आहे? हे सारं त्याने ज्या पद्धतीने केलं त्यात आगळेपण आहे. तेच मला सांगायचे आहे. त्याने शुभेच्छा पत्रावर स्वत:च्या आईचं नाव तर टाकलंच, पण त्यासोबत आजी, मावश्या मामी या सगळ्यांचीही नावं टाकली आणि देणार्यांच्या नावाच्या जागी स्वत:सोबत उपस्थित असलेल्या व नसलेल्या भावाबहीणीचीही नावे टाकली. म्हणजे या सगळ्या आपल्या सगळ्यांच्या आया आहेत. भेटवस्तूही सगळ्यांसाठी सारख्याच आणल्या. हे सारे स्वत:हून. कोणी सांगितले म्हणून नाही. आहे ना वेगळेपण. आजकाल न दिसणारं काहीतरी. परस्परांना धरून ठेवण्याची वृत्ती, परस्पर स्नेह, ओढ आणि सार्यांचं एकजीव, एकजीनसीपण. अन ते व्यक्त करण्याची कल्पकता. खर्च वगैरे तर काय आजकाल पुष्कळ लोक पुष्कळ करत असतात. पण आयुष्य साजरं करतानाची ही भावना!! ही हृद्य नाही असे कोण म्हणेल?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा