बुधवार, ८ डिसेंबर, २०२१

लहान होईन

 'काय करतोस सध्या?'

'लहान होण्याचा प्रयत्न !!'

'काय?'

'लहान होण्याचा प्रयत्न !!'

'लोक मोठं होण्याचा प्रयत्न करतात अन तू...'

'हो. सगळे मोठं होण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्या प्रोफेशनला गर्दी आहे. खूप म्हणजे खूपच. स्पर्धाही खूप. संधीही कमी. तेव्हा म्हटलं खात्रीशीर काही करावं. मग लहान होण्याचं ठरवलं.'

'पण अचिव्ह काय करणार शेवटी?'

'म्हणजे निश्चित नाही सांगता येणार. पण लहान लहान लहान होत होत होत शेवटी या सृष्टीचा जो छोट्टासा प्रारंभबिंदू असेल ना, तो होऊन जाईल बहुतेक. ज्या बिंदूतून सगळं विश्व आकाराला आलं ना तो बिंदू. आदिबिंदू होऊन जाईल!!'

- श्रीपाद कोठे

बुधवार, ९ डिसेंबर २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा