आज पूज्य बाबासाहेबांचा महानिर्वाण दिवस. त्यानिमित्त एक विचार.
- आपण लोकशाही स्वीकारली आहे. सर्वोच्च सत्ता लोकांची आहे. पण लोकांना म्हणजे आपल्याला, सत्ता आपली वाटते का? इतिहास आणि वर्तमान सांगतात की, आपल्याला सत्ता नव्हे तर सत्ताधारी आपले वाटतात. आपल्याला हवे असलेले सत्ताधारी असतील तर सत्ता आपली नाही तर नाही. वास्तविक सत्ता आपली वाटायला हवी. म्हणजे आपल्या आशा, आकांक्षा, अडचणी, समस्या, गरजा, व्यवस्थेतल्या तृटी, सुधारणेच्या सूचना; या आणि यासारख्या बाबी यांच्यावर आपण focused राहू शकतो. आपली सत्ता जो चालवत असेल त्याला ती योग्य मार्गाने आणि पद्धतीने न्यायला भाग पाडू शकतो. पण आपल्याला सत्ता आपली वाटतच नाही. सत्ताधारी आपले वाटतात. हे बदलता येईल का? बदलायला हवे का?
- श्रीपाद कोठे
६ डिसेंबर २०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा