शुक्रवार, ४ फेब्रुवारी, २०२२

राजकीय परिवर्तन

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चा ऐकण्यासारखी आहे. सत्तारूढ पक्षाला विरोध करणारे सदस्य; वेद उपनिषद, भारतीय ethos वगैरे बोलतायत. एका काँग्रेस सदस्याने तर (नाव नोंदवायचे राहिले) पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचाही उल्लेख आदराने केला. हे स्वागतार्ह आहे. भाजपचे लोकही गांधीजी, नेहरू, पटेल यांच्याविषयी बोलू लागले आहेत. हे सगळे राजकीय एकीकरणाकडे घेऊन जाणारे आहे. केजरीवाल यांनी हनुमान चालीसा म्हणणे, आंदोलनात तिरंगा आणि राष्ट्रगीत; या गोष्टीही चांगल्याच आहेत. विरोधक 'हिंदुराष्ट्र' यावर मात्र आक्षेप घेत आहेत. एक सुचवावंसं वाटतं - वेद, उपनिषद स्वीकारणाऱ्या विरोधकांनी अथर्ववेदापासून चालत आलेल्या 'राष्ट्र' विषयाचाही थोडा अभ्यास करावा. या विरोधकांच्या मनात वेद, उपनिषद स्वीकारतानाच 'राष्ट्र'कल्पना मात्र विदेशी असते. त्यामुळे पुष्कळच गोंधळ होतो. विरोधकांनी थोडे भारतीय राष्ट्र विचाराकडेही लक्ष द्यावे.

- श्रीपाद कोठे

५ फेब्रुवारी २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा