सध्या सचिन तेंडुलकरचं एक चित्र फिरतं आहे. सचिन संघ स्वयंसेवक असल्याचा भास देणारं. त्यातून देशभक्ती म्हणजे संघ आणि देशभक्त म्हणजे संघ स्वयंसेवक असं अधोरेखित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा उपहासही असू शकतो किंवा अतिउत्साह सुद्धा. पण देशभक्ती म्हणजे संघ किंवा देशभक्त म्हणजे संघ स्वयंसेवक हे समीकरण योग्य नाही. सगळे लोक नागरिक म्हणून, माणूस म्हणून देशभक्त असायला हवेत. संघ किंवा संघ स्वयंसेवक हा वेगळा वर्ग नाही आणि व्हायला नको. संघाचे स्वयंसेवक असे प्रकार करत असतील असे वाटत नाही. कोणी अति उत्साहात करत असतील तर तसे करू नये. अन अन्य लोक करत असतील तर त्याला प्रोत्साहन देऊ नये, त्याचा प्रचार प्रसार करू नये. शक्य झाल्यास हे अयोग्य आहे असे नोंदवावे.
- श्रीपाद कोठे
५ फेब्रुवारी २०२१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा