पी. परमेश्वरन जी निजधामी गेले. एक प्रसंग आठवला. भारतीय मजदूर संघाचं अखिल भारतीय अधिवेशन होतं. नागपूरला रेशीमबागेत. प्रथमच भामसंच्या अधिवेशनाला मजदूर क्षेत्रातील सगळ्या संघटनांच्या प्रतिनिधींना आमंत्रित केले होते. बहुतेक सगळ्यांचे प्रतिनिधी आले होते. अधिवेशनाच्या उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष होते पी. परमेश्वरन जी. त्यांचा परिचय करून दिला स्व. दत्तोपंत ठेंगडी यांनी. परमेश्वरनजी भारतीय विचार केंद्राचे अध्यक्ष आहेत हे सांगताना ते म्हणाले - 'आम्ही जी शस्त्रे घेऊन लढतो ती सारी सांभाळणे, त्यांना धार लावणे, ती गोळा करणे, ती वाढवणे, त्यांचे रक्षण करणे हे काम परमेश्वरनजी करतात. पण एवढेच नाही तर ही शस्त्रे ते चालवूही शकतात आणि चालवतात.' आज सहज आठवण झाली.
- श्रीपाद कोठे
९ फेब्रुवारी २०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा