बौद्ध दर्शन नास्तिक व जडवादी दर्शन आहे. त्यामुळेच भगवान बुद्धांनी शून्यवाद मांडला. वेदांत हा आस्तिक आणि चेतनवादी आहे. त्यामुळे वेदांताने पूर्णवाद मांडला. अर्थात दोन्हीचा आपापल्या सोयीने वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. स्वार्थ आणि लहरीपणा यांचे समर्थन करताना शून्यवादाचा गैरवापर होतो, तर सत्ताकांक्षा आणि दांभिकता यांचे समर्थन करताना पूर्णवादाचा गैरवापर होतो. शून्य अथवा पूर्ण हे potential म्हणून सत्य आहेत. मात्र त्यामुळेच अव्यक्त आहेत. kinetic अर्थाने ते सत्य नाहीत. बीजामध्ये संपूर्ण वृक्ष असतो तसे. मात्र बीजाला पाने, फुले, फांद्या, फळे पाहायला गेलो तर निराशा होईल. अन वृक्षाच्या अवयवांमध्ये वृक्ष शोधायला गेलो तरीही निराशाच हाती येईल. मग त्याचा उपयोग काय? त्यावर डोकेफोड करण्याची गरज काय? त्यावर पुन्हा कधी. ही डोकेफोड अतिशय आवश्यक आहे हे मात्र खरे.
- श्रीपाद कोठे
७ फेब्रुवारी २०१६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा