आज एका तरुणाने आपल्या जन्मदात्यांविरुद्ध न्यायालयात धाव घेतली की, यांनी जन्म देण्यापूर्वी आपली परवानगी घेतली नाही. यावर खूप अंगांनी खूप लिहिता, बोलता येईल. एक मात्र खरं की, मस्करी वा दुर्लक्ष करण्याएवढी ही सामान्य बाब नाही. यावर कधी पुन्हा लिहीन पण तूर्त एकदोन प्रश्न-
१) बाबा रे, तुझी म्हणजे कोणाची परवानगी घ्यायला हवी होती?
२) त्यांनी जन्माला घालण्यापूर्वी तुझं अस्तित्व होतं का?
३) जन्माला येण्यापूर्वी तुझा पत्ता काय होता?
४) तुझी भाषा कोणती होती?
५) कोणत्या पद्धतीने तुझी परवानगी घ्यायला हवी होती?
- श्रीपाद कोठे
८ फेब्रुवारी २०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा