रविवार, ६ फेब्रुवारी, २०२२

शांत स्थिती


१) पुस्तके मनाला शांत करतात की, मन शांत असलं की पुस्तके आनंद देतात?

२) संगीत मनाला शांत करतं की, मन शांत असलं की संगीत आनंद देतं?

३) निसर्ग मनाला शांत करतो की, मन शांत असलं की निसर्ग आनंद देतो?

४) माणसे मनाला शांत करतात की, मन शांत असलं की माणसे आनंद देतात?

५) खाणं पिणं मनाला शांत करतं की, मन शांत असलं की खाण्यातून आनंद मिळतो?

६) ध्यानाने मन शांत होतं की, मन शांत असलं की ध्यानाचा आनंद मिळतो?

७) प्रार्थनेने मन शांत होते की, मन शांत असलं की प्रार्थना करता येते?

- श्रीपाद कोठे

७ फेब्रुवारी २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा