गंमत वाटते खूपदा. जगणं, हे विश्व, धडपडी यात काहीही अर्थ नाही, असं अतिशय विश्वासाने सांगणारे अनेक `स्वनामधन्य नास्तिकवादी/ इहवादी/ जडवादी/ भौतिकवादी/ विज्ञानवादी विचारवंत, कलावंत, चिंतक' नेमकं काय आणि का शोधत असतात? कशाचा शोध चाललेला असतो त्यांचा? सुख, आनंद, समाधान, सार्थकता, शांती यांचा शोध ते का घेतात? किंवा या गोष्टींसाठी धावपळ वा आटापिटा तरी कशाला करत असावेत? `कशातच काही अर्थ नाही' यावर त्यांचा विश्वास असतो का? त्यांना मनातून हा सिद्धांत पटलेला असतो का? की तो फक्त त्यांचा वैताग असतो? सगळंच शून्य आहे असं म्हणणारे भगवान बुद्ध यांच्यासह सगळे शून्यवादी नेमका कशाचा शोध घेतात? कशासाठी धडपडतात? आणि का?
- श्रीपाद कोठे
४ फेब्रुवारी २०१७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा