शुक्रवार, ४ फेब्रुवारी, २०२२

विज्ञानाचे मुकेपण

मला ओढ/ प्रेम/ स्नेह वगैरे वाटते एखाद्या व्यक्तीची/ विचाराची/ जागेची/ वस्तूची/ वगैरे...

किंवा,

मला राग/ द्वेष/ तिरस्कार वगैरे वाटतात एखाद्या व्यक्तीबद्दल/ विचाराबद्दल/ जागेबद्दल/ वस्तूबद्दल वगैरे...

मग विज्ञान सांगतं- तुझ्या मेंदूत अमुक बदल होतात, अमुक रसायने स्रवतात वगैरे. त्यामुळे ओढ किंवा तिरस्कार निर्माण होतात इत्यादी. विज्ञान हे विश्लेषण करते ते खरेच असते, पण क्रिया झाल्यानंतरचे असते. क्रिया होण्यापूर्वीचे काय? ती का होते? ओढ वाटते तेव्हा अमुक होते किंवा तिरस्कार वाटतो तेव्हा अमुक होते; पण ओढ वा तिरस्कार यांचे मूळ काय.

विज्ञान फक्त परिणामांचे विश्लेषण करते असेच म्हणावे लागते. नाही तरी सगळीच शास्त्रे या विश्वाचे विश्लेषण/ विच्छेदन करतात. विश्वाचे मूळ वा त्याचे प्रयोजन यावर तर विज्ञान मुकेच आहे ना !!

- श्रीपाद कोठे

- ५ फेब्रुवारी २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा