गुरुवार, ५ मे, २०२२

कामगारांचा प्रश्न

हजारो कामगार आपापल्या गावी परतत आहेत. परतण्याची कारणे बरीच आहेत. हे लोक परत येतील वा नाही; केव्हा येतील हेही प्रश्न आहेत. उद्योग आणि व्यापार हळूहळू सुरू होणार. त्याच वेळी माणसांची टंचाई उद्योजक आणि व्यापाऱ्यांना जाणवणार. असे सगळे होते आहे अन होणार. काय करता येईल?

- घरी परतलेल्या कामगारांचा उपयोग करण्याच्या योजना आणि त्यांचे क्रियान्वयन.

- लगेच कोणकोणती कामे करता येतील याच्या आणि कायमस्वरूपी काय उभे करता येईल याच्या; कामांच्या, उद्योगांच्या, व्यापाराच्या याद्या तयार करणे.

- बस स्थानके, रेल्वे स्थानके, डाक कार्यालये, सगळी सरकारी कार्यालये, सगळी रुग्णालये, सगळ्या शैक्षणिक संस्था, वाचनालये, ग्रंथालये, सगळ्या सार्वजनिक इमारती; यांची दुरुस्ती, डागडुजी, रंगरंगोटी; ही कामे सहज करता येतील.

- वृक्षारोपण, औषधी वनस्पतींची लागवड, पाण्याशी संबंधित अनेक कामे; हे सारे करता येईल.

- यासाठी आमदार, खासदार, लोक प्रतिनिधी यांचे निधी वापरण्याला परवानगी देता येईल. वेगवेगळ्या योजनांचे निधी या कामांकडे वळवता येतील.

- राजकीय, सामाजिक, धार्मिक नेत्यांनी या अनुषंगाने लोकांशी संवाद साधता येईल.

- खूप पैसा मिळेल ही अपेक्षा न ठेवता; उपलब्ध पैशाचा उपयोग करून; आपल्या परिश्रमांनी लक्ष्मी निर्माण करायची आहे; असे सलगीयुक्त आवाहन करता येईल.

- कोणते उद्योग exclusively ग्रामीण भागात ठेवावे; याची सूची करता येईल.

यात आणखीन भर घालता येईलच. स्वतःहून असा विचार आणि त्यासाठी पुढाकार घेणे हे सुजाण नेत्यांचे काम आहे. असे व्हावे अशी इच्छा आहे.

- श्रीपाद कोठे

६ मे २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा