सोमवार, २ मे, २०२२

कांदा

कधीतरी शंभरी गाठणारा कांदा आता ५-१० रुपयांवर आल्याने पुन्हा रडवायला लागला आहे. त्यानिमित्ताने काही मुद्दे-

१) आज कांदा ५-१० रुपयांवर आल्याने कांदा उत्पादक व व्यापारी रस्त्यावर कसे येऊ शकतात? ८०-१०० रुपयांनी कांदा विकला तेव्हा जो अमाप पैसा कमावला तो उधळून टाकला का या लोकांनी? अन तसा उधळला असेल तर चूक कोणाची? साधा व्यवहार अन धोरणीपणा समजत नसेल तर गळेही काढू नयेत.

२) कांदा ५-१० रुपयांवर आल्याने रस्त्यावर ओतणे किती योग्य? त्यापेक्षा प्रसंगी फुकट वाटायला काय हरकत आहे? एवीतेवी वाया घालवणार असतील तर त्यापेक्षा दानधर्म काय वाईट? `पैसा संस्कृती'ने घडवलेले हे स्खलन आहे. चांगुलपणा, विचारीपणा अन पैसा यांचा काहीही संबंध नाही. चांगुलपणा, विचारीपणा यांचा संबंध माणूसपणाशी आहे. एखादी व्यक्ती दरिद्री असेल म्हणून तिने अविचारी असावे असे कोणाला वाटत असेल किंवा तसे समर्थन कोणी करीत असेल तर ते हास्यास्पद आहे. टमाटे इत्यादींच्या बाबतीतही असेच होते.

- श्रीपाद कोठे

३ मे २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा