नागपूर महानगरपालिका rain water harvesting साठी पुढाकार घेणार, मदत करणार अशी बातमी वाचली. त्यात म्हटल्याप्रमाणे एका rain water harvesting साठी १४ हजार रुपयांचा खर्च येतो. त्यानुसार सहज हिशेब लावून पाहिला. ८०० खासदारांना दरवर्षी मिळणाऱ्या पाच कोटी रुपयांच्या मतदारसंघ निधीतून देशभरात २८ लाख rain water harvesting युनिट्स तयार होऊ शकतील. ईशान्य आणि आसाम, पश्चिम बंगाल या राज्यात rain water harvesting ची गरज नाही. त्यामुळे तो निधी अन्यत्र वापरता येऊ शकेल. याशिवाय सगळ्या राज्यातील आमदारांनाही मतदारसंघ निधी मिळतो. त्यातून आणखीन लाखो (खरे तर करोडो) rain water harvesting युनिट्स आकारास येऊ शकतील. शिवाय नाना, मकरंद सारखे चित्रपट कलावंत सुद्धा हातभार लावू शकतात. माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रात काम करणारे अन लाखोंचे package घेणारे, डॉक्टर्स, वकील असे व्यावसायिक, शिवाय आमदार, खासदार नसलेले (राहून गेलेले वा होऊ इच्छिणारे लाखो) काही ना काही भार उचलू शकतील. या सगळ्यांसाठी १४ हजार रक्कम फार नाही. शिवाय ती एकदा खर्च केल्यावर दरवर्षी पुन्हा करावी लागत नाही. एक rain water harvesting युनिट दीर्घकाळ काम करीत राहील. एका झटक्यात पाणी समस्येचं मोठ्या प्रमाणात निराकरण होऊ शकेल. आजचीच बातमी आहे की यावर्षी देशभरात सरासरीपेक्षा ४० टक्के अधिक पाऊस पडेल. अनेक ठिकाणी ७० टक्के अधिक पाऊस पडेल. (आधीचा अंदाज ४ टक्के अधिकचा होता.) ही सूचना/ हा विचार पटत असल्यास जितका पसरवता येईल अन प्रत्यक्षात आणता येईल तो आणावा. फायदा सगळ्यांचाच आहे.
- श्रीपाद कोठे
३ मे २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा