जातीयता केवळ एक जात करीत नाही. कधी काळी अस्तित्वात असलेल्या आणि आज बिल्ले मिरवणाऱ्या ब्राम्हण, दलित, बहुजन, आदिवासी, भटके, विमुक्त वगैरे सगळ्यांमध्येच असे लोक आढळतात. `मी फक्त माणूस म्हणून विचार करीन. अन्य कोणी कसाही विचार केला तरी मी ठाम राहीन आणि जातीयवाद्यांची संख्या किमान एकाने कमी करीन,' असा प्रथमपुरुषी विचार करणारे हवेत. बाकीचे तसा विचार करतात म्हणून आम्हीही तसाच करू, असे म्हणणारे कोणत्याही जातीपातीचे असोत; त्यांना जातीयवादीच समजले पाहिजे.
- श्रीपाद कोठे
३ मे २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा