गायत्री परिवाराचे प्रमुख प्रणव पंड्या यांना काल राज्यसभेत मनोनीत करण्यात आले. खरं सांगतो, मला आवडलं नाही अन पटतही नाही. गायत्री परिवार आणि प्रणव पंड्या यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे. पण सगळ्या गोष्टी राजकारणाशी जोडणे, सगळ्या गोष्टींवर राजकीय शिक्का मारणे, राजकीय शिक्क्याशिवाय विचार करू न शकणे; या सगळ्या गोष्टी लघुत्वाच्या आहेत. प्रणव पंड्या खूप मोठे आहेत. त्यांनी खासदार होऊन अथवा त्यांना खासदार करून, अथवा त्यांना खासदार होण्यासाठी भाग पाडून कोणी काय साधले माहित नाही. पण वटवृक्षाचे बोन्साय छान वगैरे वाटले तरीही चुकीचे अन निरुपयोगी असतात. राजकारणात चांगल्या लोकांनी गेले पाहिजे, त्याचा उपयोगच होतो, त्याने फायदाच होईल; इत्यादी युक्तिवाद करणाऱ्यांना फारसे काही कळत नाही, एवढेच फक्त म्हणता येईल. हे सगळेच युक्तिवाद ही बौद्धिक फसवणूक आहे अन असते.
- श्रीपाद कोठे
५ मे २०१६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा