कोणीतरी कधीतरी बोललं की, हिंदू लोक माहीतच नसलेल्या गोष्टी कवटाळून बसतात अन प्रत्यक्ष प्रत्ययाला येणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून निरर्थक जीवन जगतात. झाले, आपणही त्याचीच री ओढू लागलो अन खाणे-पिणे, मौजमजा, स्पर्धा- संघर्ष- कुरघोडी- म्हणजेच सारसर्वस्व आहे असे समजून तसे वागू लागलो. जणू काही तो जो कोणी जे काही बोलला तेच सत्य आहे असे समजून... त्यावर प्रश्न विचारावे, तर्क मांडावे, भवती न भवती करावी असेही आम्हाला वाटले नाही. यालाच म्हणतात का कालमहिमा??
- श्रीपाद कोठे
१६ मे २०१६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा