- community kitchen, सांझा चुल्हा ही एक चळवळ आणि पुढे जीवनाचा भाग व्हायला काय हरकत आहे?
- छोटी गावे, लहान शहरे ही उत्पादनाची केंद्रे होण्यासोबतच वितरण आणि विक्रीची केंद्रेही व्हावीत. घाऊक किंवा किरकोळ खरेदीसाठीही मोठ्या गावातील, शहरातील लोकांनी; जिथे जाणे येणे शक्य असेल तिथे; लहान उत्पादन केंद्रांवर जावे. उत्पादनांची प्राथमिक विक्री शहरात करण्याऐवजी उत्पादनाच्या ठिकाणीच करावी.
- मुंबईचे महत्व कमी होण्याची शरद पवार यांची भीती खरी ठरावी आणि मूठभर लोकांसाठी चार दोन शहरांचे महत्व वाढवण्याऐवजी; सारखीच महत्वाची ५००-६०० शहरे तयार व्हावीत.
- मुंबई, दिल्ली सारख्या महानगरात कोण शत्रू आहे, कोण घुसखोर आहे, कोण अतिरेकी आहे, कोण गुन्हेगार आहे; हे कळणेच अवघड असते. लहान शहरात हे तुलनेने सोपे असते. कोणत्याही मानवी वा नैसर्गिक emergency च्या वेळी; सर्व प्रकारचे व्यवस्थापन लहान शहरात लवकर आणि परिणामकारक पद्धतीने करता येते. वेळप्रसंगी जगाशी संबंध स्थगित वा सुरू करणे आणि तरीही सामान्य व्यवहार नियमित ठेवणे लहान शहरात शक्य होऊ शकते.
- श्रीपाद कोठे
४ मे २०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा