आज एक छायाचित्र पाहिलं- त्याला दिलेल्या caption मध्ये असा उल्लेख आहे की, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी cabinet बैठकीत मंत्र्यांनी घरून जेवणाचा डबा आणायला सांगितले होते. अन बैठकी दरम्यान मंत्र्यांच्या सहभोजनात ते आपल्या डब्यातील पदार्थ वाढत होते.
छान वाटले छायाचित्र पाहताना. हा एका बैठकीतील विशेष उपक्रम होता की नेहमीसाठीची प्रथा हे स्पष्ट झाले नाही. हा कायमस्वरूपी व्यवहार व्हायला हरकत नाही.
त्याचवेळी दुसरा एक विचार आला- राजधानी आदी गाड्यांमध्ये welcome kit, त्यानंतर खाद्यपदार्थ, पेय, जेवण असे सगळे असते. याची खरंच गरज आहे का? हे बंद करता येणार नाही का? ज्याला हवे त्याला विकत घ्यायला केव्हाही मुभा असावीच. उपलब्धताही असावी. पण तिकिटाच्या दरातच या सगळ्या गोष्टींची किंमत आकारून ज्या पद्धतीने पुरवले जाते, त्याचे प्रयोजन काय? नको असलेल्यांना विनाकारण taxing, अपव्यय, गैरवापर, घरी घेऊन जाणे, वाया घालवणे, प्रतिष्ठेच्या अवास्तव- खोट्या- उथळ- भावनांची जपणूक, साधनांची नासाडी आणि आंतरिक भावविश्वाचीही नासाडी. सगळीकडे असे आहे म्हणून आम्हीही odd man out ठरू नये यासाठी हा अट्टाहास आमचेच खुजेपण नाही दाखवत? सगळ्यांसोबत, सगळ्यांसह, सगळ्यांसारखं याचा अतिरेक योग्य आहे?
- श्रीपाद कोठे
३ मे २०१७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा