इस्लाम, ख्रिश्चन, मार्क्सवाद, भांडवलवाद, समाजवाद, विज्ञानवाद, तंत्रवाद, स्त्रीवाद, इहवाद, जडवाद, भौतिकवाद - हे सगळेच जगाला आपल्या रंगात आणि साच्यात घालण्याचा; वैध किंवा अवैध प्रयत्न करतात. तोच त्यांचा अजेंडा आहे. हिंदुत्वाला हे मान्यही नाही अन त्याचा तसा प्रयत्नही नाही. परंतु आपल्याच रंगात आणि साच्यात जगाला कोंबण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या हाती जग जाऊ नये, ही ईश्वरदत्त (ईश्वर न मानणाऱ्यांसाठी नियतीदत्त) जबाबदारी पार पाडण्यासाठी संघर्ष आणि समन्वय या दोन्ही मार्गांनी प्रयत्न करणे; आपल्याच रंगात वा साच्यात जग ओतण्याचे प्रयत्न करणाऱ्या गोडबोल्या, कडूबोल्या, हेकड, भेकड, एकांगी अथवा क्रूर अशा सगळ्यांचे खुले वा छुपे मनसुबे आणि चाली हाणून पाडणे; हा हिंदुत्वाचा युगधर्म आहे. हिंदुत्व हिंदुत्वासाठी नसून विश्वकल्याणासाठी आहे. तरीही हिंदुत्वाचा आग्रह हा गोड वा कडू अतिरेक हाणून पाडण्यासाठीचा युगधर्म आहे.
- श्रीपाद कोठे
५ मे २०१८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा