शनिवार, ७ मे, २०२२

पहा विचार करून- (हिंदू)

हिंदू हा वंश, प्रदेश, जातीवाचक शब्द नाही. गुणवाचक आहे. त्यामुळे विशिष्ट गुणांनी युक्त आणि त्या विशिष्ट गुणांसाठी प्रयत्न करणारा, तसंच त्या विशिष्ट गुणांविषयी आस्था असणारा तो हिंदू. मग तो जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात राहणारा, कोणत्याही वंशाचा, कोणत्याही रंगाचा, कोणतीही भाषा बोलणारा, कोणत्याही कालखंडातील, कोणताही उपासना पंथ मानणारा, उपासना पंथ न मानणारा; असा या पृथ्वीच्या पाठीवरील कोणीही हिंदू. मुळातल्या गुणवाचक शब्दाला; वंश, प्रदेश, जातीच्या चौकटीत अडकवले इंग्रजांनी. त्या जागी पुन्हा एकदा त्याच्या मूळ गुणवाचक अर्थाचा पुरस्कार सुरू केला तर संघर्ष तर कमी होईलच; पण पृथ्वीच्या पाठीवर किमान ९० टक्के लोक हिंदू असतील. हिंदू किती जुने आहेत, सगळ्या लोकांचे मूळ कसे एकच आहे, demographic change; इत्यादी न करता; हिंदू या शब्दाची गुणवाचक मांडणी करण्याचे प्रयत्न केले तर? आणि अर्थात हे केवळ धोरण म्हणून नाही तर तोच त्याचा मूळ आशय आहे म्हणून. हा विषय धोरणाचा नसून मूळ आशय पुन्हा प्रस्थापित करण्याचा आहे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

बुधवार, ८ मे २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा