सगळेच संघर्ष...
उदा. - १) इस्रायल, पॅलेस्टाईन; २) कोरोनाच्या निमित्ताने पाहायला मिळणारे विविध संघर्ष; ३) राजकीय, आर्थिक, सामाजिक, भौगोलिक संघर्ष, ४) आरक्षणाचा संघर्ष; असे असंख्य. हे सगळेच भय आणि भोग यांच्या पोटी जन्म घेतात. हे ध्यानात न घेतल्यानेच संघर्ष उत्तरोत्तर वाढत आहेत. संघर्षशून्य स्थिती is utopia. पण संघर्ष कमी नक्कीच होऊ शकतात अन व्हायला हवे. त्यासाठी प्रयत्नही होतात पण ते कमी होत नाहीत कारण त्याच्या मुळाशी आपण जात नाही. अगदी मुस्लिम, ख्रिश्चन, साम्यवादी इत्यादी संघर्ष सुद्धा याच प्रकारचे. म्हणूनच ते संपवण्यासाठी झालेल्या आजवरच्या सगळ्या प्रयत्नांनी नवीन संघर्षांना जन्म दिला. मूळ लक्षात घेतले नाही तर पुढेही असेच होत राहील. नावे काहीही असली तरीही. भय आणि भोग ही मूळ कारणे address करायला हवीत अन त्याची पद्धत प्रचलित पद्धतींहून वेगळी असणं अपरिहार्य आहे.
- श्रीपाद कोठे
१६ मे २०२१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा