Axis बँकेची एक छान जाहिरात सध्या दाखवली जाते. एक गर्भवती बँकेत जाते आणि बँकेचा दरवाजा बंद करणारा रखवालदार दार उघडून close ची पाटी open अशी करतो. व्यवस्थापक का असं विचारतो. तेव्हा फक्त त्या महिलेकडे बोट दाखवतो. व्यवस्थापक मानेनेच ठीक म्हणतो. अतिशय सुंदर, अर्थपूर्ण, संस्कारी जाहिरात आहे. व्यवस्थापक ते रखवालदार सार्वत्रिक ही समज निर्माण झाली तर? किंबहुना जर काही व्हायला हवं असेल तर हीच समज. नाही का? रा. स्व. संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी एक सुभाषित सांगत असत. ते लक्षात नाही पण भावार्थ हा की - ओझेवाला, गर्भिणी, रोगी हे समोरून येत असतील तर त्यांना रस्ता मोकळा करून दिला पाहिजे. हिंदुत्वाची मूल्यव्यवस्था ती हीच.
- श्रीपाद कोठे
६ मार्च २०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा