रविवार, १३ मार्च, २०२२

कालची तीन निरीक्षणे...

- कमलनाथ यांचं एखादं विधान घेऊन त्यावर राष्ट्रीय चर्चा करणं आणि अकटोविकट निष्कर्ष काढणं, ही प्रसार माध्यमांची बौद्धिक दिवाळखोरीच म्हटली पाहिजे.

- भारत सरकारने करोना संदर्भात चांगली पावलं उचलली. इराणला तर एक प्रयोगशाळाच धाडून दिली. यासाठी सरकारने पाठ थोपटून घ्यावी. समर्थकांनी सरकारची पाठ थोपटावी. ते समजून घेता येईल, त्याचे समर्थन पण करता येईल. पण करोनामुळे भारतात फक्त दोघांनाच प्राण गमवावे लागले किंवा भारताचा नमस्कार सगळ्या जगाने स्वीकारला; यात सरकारचे काय कर्तृत्व वा कौतुक? पण तसे होते तेव्हा ते हास्यास्पद ठरते. इतकंच नाही तर या क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टींपासूनच सगळं बिघडायला सुरुवात होते.

- माणसाला प्रज्ञा आणि मेधा अशा बुद्धीच्या दोन क्षमता असतात. माझ्या समजुतीप्रमाणे प्रज्ञा म्हणजे बुद्धीची ग्रहणक्षमता आणि मेधा म्हणजे बुद्धीची धारणक्षमता. आपल्या वागण्या बोलण्यातून या क्षमता दिसून येतात. अर्णव गोस्वामीची मेधा फारशी चांगली नसावी. तो धरून ठेऊच शकत नाही बहुतेक. आज इटलीतील भारतीय राजदूत श्रीमती संधू आणि अपोलो हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. रेड्डी यांच्याशी चर्चा करतानाही त्याचा बालिशपणा दिसून आला.

- श्रीपाद कोठे

१४ मार्च २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा