हिंदू, हिंदुत्व यांची उपेक्षा ही वास्तविकता असूनही; भारतीय राजकारणाने सात आठ दशके त्याकडे राजकीय चष्म्यातून पाहिले. त्याचा राजकीय फायदा भाजपने घेतला. समाजाचे मात्र नुकसान झाले.
शेतकरी, वनवासी, आर्थिक-सामाजिक प्रश्न ही देखील वास्तविकता आहे. त्याकडे राजकीय चष्म्यातून पाहणे घातक होईल.
विषयांकडे, मुद्यांकडे राजकीय चष्मे बाजूला ठेवून पाहण्याची सवय समाजाला असली पाहिजे. अनेक गोष्टींमधील राजकारण उघडउघड दिसत असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून; जाणूनबुजून त्याच्या अन्य पैलूंची चर्चा घडवून आणली पाहिजे. राजकारणाचे दोन गुण असतात- १) कोणत्याही गोष्टीला स्पर्श करून तिचा चोथा करणे आणि मग त्याचे राजकारण करणे. २) दुसरा गुण म्हणजे, चांगली वा वाईट, योग्य वा अयोग्य, या बाजूची किंवा त्या बाजूची; राजकारणाची होणारी कोणतीही चर्चा राजकारणाला बळच देते. ती टाळणे, त्याकडे दुर्लक्ष करणे, त्याला बेदखल करणे; समाजाच्या स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे. समाजाच्या मनात समाज म्हणून दुखलं पाहिजे.
मग मी तरी राजकारणावरची ही पोस्ट का लिहिली? एक लक्षात घ्यायला हवे- राजकारणाची चर्चा आणि समाजाचा भाग म्हणून राजकारण या विषयाचं विश्लेषण या गोष्टी भिन्न आहेत. तूर्त एवढेच.
- श्रीपाद कोठे
१३ मार्च २०१८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा