सोमवार, ७ मार्च, २०२२

स्वातंत्र्य

स्वातंत्र्य ही सुखाची, समाधानाची, आनंदाची, शांततेची किंवा विकासाची हमी असते का? पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ किंवा जगभरातील नवस्वतंत्र देश; अथवा स्वातंत्र्य उपभोगणारे जुने देश सुख, समाधान, आनंद, शांतता या संदर्भात कुठे आहेत? किंवा आज महिला दिन असल्यामुळे तोही एक पैलू. मीनाकुमारी, मधुबाला, परवीन बॉबी, करिश्मा कपूर, सुनंदा पुष्कर किंवा परवाच घरातून गायब झालेली दिल्लीची मॉडेल, अथवा घरोघरी (विशेषत: महानगरात) स्वातंत्र्य, अधिक स्वातंत्र्य, अधिक अधिक स्वातंत्र्य असे करीत जगणाऱ्या महिला, मुली सुख, समाधान, आनंद, शांतता मिळवू शकल्यात? याचा अर्थ कोणीतरी कोणावर तरी सतत सत्ता गाजवत राहावी असे नाही. याचा अर्थ एवढाच की स्वातंत्र्य हे सुख, समाधान, आनंद, शांतता यांचा स्रोत व्हायचा असेल तर, विचारीपण, परिपक्वता, दंभ आणि आढ्यताखोरी यांचा अभाव, मेळ घालण्याचे कौशल्य यांची मागणी करतं. यांच्या अभावी स्वातंत्र्य कुचकामीच नव्हे तर अभिशाप ठरतं.

- श्रीपाद कोठे

८ मार्च २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा