नागपूर महापालिकेतर्फे सध्या हत्तीरोग प्रतिबंधक मोहीम सुरू आहे. काही जाहिराती, बातम्या, फलक दिसले. या मोहिमेची माहिती आणि जागृती यासाठी. यासोबतच कर्मचारी घरोघरी जाऊन माहिती टिपून घेऊन तीन प्रकारच्या औषधी गोळ्यांचे वाटप करीत आहेत. लहान मोठ्या सगळ्यांना या गोळ्यांचे वाटप केले जात आहे. पण या औषधवाटपाची authenticity काय? बातम्या, जाहिराती, फलक जे पाहण्यात आले; ते पुरेसे वाटत नाहीत. मान्यताप्राप्त डॉक्टर्स, ज्येष्ठ नेते, अधिकारी, नगरसेवक, विविध पक्षांचे स्थानिक पदाधिकारी, स्थानिक विश्वसनीय संस्था; यांना सहभागी करून घ्यायला हवे. पत्रके वाटल्यासारखे औषधवाटप करून उपयोग नाही अन ते योग्यही वाटत नाही. लोकांच्या आरोग्याचा प्रश्न अधिक काळजीपूर्वक हाताळायला हवा.
- श्रीपाद कोठे
३ मार्च २०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा