रविवार, १३ मार्च, २०२२

प्रबोधन युग

- आजच्या सामाजिक तणावाचे एक कारण ज्याला प्रबोधन युग म्हटले जाते त्यातही आहे. सामाजिक परिवर्तनाची मशाल हाती घेतलेल्या बहुतेक सगळ्या महापुरुषांचे प्राधान्यक्रम, भाषा, विविध गोष्टींचं आकलन, विदेशी अभ्यासकांच्या चष्म्यातून लावलेले अन्वयार्थ, एकांगीपणा, आत्मनिषेध; अशा गोष्टींचा यात वाटा आहे. याचा अर्थ हे महापुरुष पूर्ण चुकले किंवा टाकाऊ होते असा नाही. त्यांचे योगदान निश्चित आहे. या प्रबोधनाची चांगली बाजूही आहेच. मात्र त्यात संतुलनाची कमतरता होती हेही खरे. तेच आजच्या सामाजिक तणावाचे कारण आहे.

- या देशातील १३० कोटी लोकांचे १३० कोटी वेगवेगळे वंश असले किंवा इथले सगळेच घटक वा समूह इथे बाहेरून आलेले असले तरीही येथील राष्ट्रीयतेला फरक पडत नाही; हे सगळ्यांनाच नीट लक्षात येईल तो सुदिन.

- श्रीपाद कोठे

१४ मार्च २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा