बुधवार, २ मार्च, २०२२

अरुणा शानभाग

अरुणा शानबागला दयामरण द्यावे का?

does euthanasia be allowed to aruna shanbaugh?

मला वाटतं की, निखळ करुणेपोटी अरुणाला दयामरण द्यावं. थोडा भयानक वाटेल असा विचार समोर ठेवतो आहे, पण अरुणाच्या जागी आपण स्वत:ला ठेवून पाहावे आणि मग विचार करावा. त्यावेळी मी काय म्हणतो आहे ते कदाचित पटेल.

एक लक्षात घ्यायला हवे की या प्रकरणाला फार फाटे फोडले जात आहेत. हा प्रकार मरण देण्याचा नाही तर life support system काढून घेण्याचा आहे. असे प्रकार रोज शेकड्याने घडत असतात. अगदी आपल्या आजूबाजुलाही. मी स्वत: अशा काही प्रकरणांचा एक जवळचा साक्षीदार होतो. काहीही भवितव्य नसलेले, अर्थहीन असे आयुष्य; जीवन/ मरण या शब्दाची जी व्याख्या आणि लक्षणे आहेत त्यात बसत नाही म्हणुनच किती सुरू ठेवायचे हा खरा प्रश्न आहे. भगवदगीतेचे तत्त्वज्ञान नसानसातून वाहाणार्या आपल्या समाजाने खरे तर अतिशय धीराने आणि शांतपणे याचा विचार करायला हवा. जन्म-मरण हा एक प्रदीर्घ प्रवास आहे. सुरुवात किंवा समाप्ती नाही. त्या परम शक्तिशी एकाकार होईपर्यंत हा प्रवास चालणार आहे. शरीर ही केवळ एक खोळ आहे. तिचा योग्य उपयोग करून त्या मार्गावर चालत राहायचे आहे. पण हे वस्त्र जीर्ण होईल तेव्हा ते टाकून देऊन नवीन वस्त्र धारण करून पुन्हा प्रवास सुरू करायचा असतो. गीतेतील-

`वासांसी जीर्णानी ' वगैरे श्लोक सगळ्यांनाच माहीत आहेत.

- श्रीपाद कोठे

३ मार्च २०११

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा