शुक्रवार, ४ मार्च, २०२२

गोशाळा

येत्या निवडणूक जाहिरनाम्यासाठी लोकांनी सूचना, कल्पना पाठवाव्यात; असे आवाहन भाजपने काही दिवसांपूर्वी केले होते. मधल्या घटनाक्रमामुळे त्याचे विद्यमान status काय आहे आणि आगामी काळात काय राहील माहीत नाही. परंतु एक सूचना मांडतो. हस्ते परहस्ते ज्यांना पोहोचवावी असे वाटत असेल त्यांनी पोहोचवावी.

- काही दिवसांच्या बाळापासून मृत्यूशय्येवर संघर्ष करणाऱ्या व्यक्तीपर्यंत सगळ्या वयाच्या, सगळ्या जगातल्या, रोगी वा निरोगी, सगळ्या स्त्री पुरुषांना लागणारी एक गोष्ट म्हणजे दूध.

- ही गरज लक्षात घेऊन देशभरात ६५ हजार गोशालांचा विकास करणे हे जाहिरनाम्यात जोडता येईल.

- ६५ हजार गोशालांचा हिशेब : लोकसंख्या १३० कोटी, पाच जणांना एक गाय (जनावर), १०० गायींची एक गोशाळा.

- या गोशाळा फक्त आणि फक्त तालुक्याच्या ठिकाणी विकसित करणे. त्याहून लहान गावांच्या त्यांच्या समस्या आणि शहरांच्या त्यांच्या समस्या यांचा विचार करून.

- साधारण साडेसहा हजार तालुके आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी १०० गुरांच्या १० गोशाळा.

- यासाठी नवीन तंत्रज्ञानाची गरज नाही. उपलब्ध तंत्रज्ञान आणि कौशल्य पुरेसे आहे.

- १०० गुरांच्या १० गोशाळा यासाठी लागणारी साधनसामुग्री, मनुष्यबळ यातून रोजगार निर्मिती.

- या गोशालातून उत्पन्न होणारे दूध आणि नंतरचे दही, ताक, लोणी, तूप, पनीर इत्यादी. त्यांचे उत्पादन, वितरण, देखभाल, विल्हेवाट.

- हे पशुधन आणि मनुष्यबळ यांच्या २४ तासाच्या आणि जन्मभराच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक, वैद्यकीय, शैक्षणिक, मनोरंजनात्मक, धार्मिक, सांस्कृतिक, तांत्रिक, यांत्रिक, कौटुंबिक अशा सगळ्या गरजा पुरवण्यातून किती मोठं कार्यचक्र- अर्थचक्र- इत्यादी विकसित होईल याची कल्पनाच केलेली बरी. माणसे कमी पडतील.

- उद्योग, माणसे, पैसा यांचे केंद्रीकरण; शहरांचे ulcer; पर्यावरणाचा ऱ्हास; मानवाचे अवमूल्यन; या सगळ्यालाच आळा बसेल.

- ग्रामीण जीवन आणि महानगरीय जीवन यांच्या त्रुटी आणि मर्यादा टाळून मध्यममार्गाने सगळ्यांना सुखाचे, शांतीचे, समन्यायी जीवन उपलब्ध करून देता येईल.

- जग काय करतं आहे, जग काय म्हणेल याचा विचार अधिक न करता; आपल्या गरजा आणि एकूण मानवी जगण्याचा विचार पुस्तकी ज्ञान बाजूला ठेवून केल्यास ही सूचना विचार करण्यासारखी नक्कीच वाटू शकते.

- एक पशु सतत दूध देऊ शकत नाही हे लक्षात घेतल्यास गोशालांची ही संख्या दुप्पट म्हणजे १,३०,००० (एक लाख तीस हजार) एवढी होऊ शकते. पर्यायाने सगळ्याच गोष्टी दुप्पट.

- श्रीपाद कोठे

५ मार्च २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा