तुम्ही आम्हाला सांगू नका देशभक्ती वगैरे. तुम्ही नका ठरवू कोण देशभक्त इत्यादी. आम्हीही देशभक्त आहोत. देशभक्तीची व्याख्या तुम्ही नका निश्चित करू.
- पुरोगामी, प्रगतीशील पत्रकार विचारवंत.
मी तुमच्याशी अगदी सहमत आहे. आम्ही नाही देत देशभक्तीची व्याख्या आणि देशभक्तीचे प्रमाणपत्र. तुम्ही सांगा देशभक्ती म्हणजे काय? आपण ते मान्य करू. पण फक्त आम्ही देशभक्त आहोत असे प्रमाणपत्र स्वत:चे स्वत:लाच देऊ नका. व्याख्या सांगा तुमची. मग ठरवू आपण.
- प्रतिगामी संघ स्वयंसेवक.
चला रे मी चलतो. महत्वाचं काम आठवलं. जायला हवं.
- - पुरोगामी, प्रगतीशील पत्रकार विचारवंत.
- श्रीपाद कोठे
९ मार्च २०१७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा