गुरुवार, ३ मार्च, २०२२

प्रतिके

प्रतिके या प्रेरणा असतात. त्यासाठी त्या प्रतिकातून काहीतरी प्रवाहित व्हावं लागतं. हे जे काही प्रवाहित व्हावं लागतं ते, ती प्रतिकं शिरोधार्य मानणाऱ्या लोकांच्या चरित्रातून आणि चारित्र्यातून निर्माण होत असतं. हे प्रवाहित होणारं तत्व जोवर निर्माण होतं तोवरच प्रतिकांमध्ये जीवंत शक्ती असते आणि ते प्रेरणा देतात. त्या तत्वाच्या क्षीण होण्याने किंवा लुप्त होण्याने प्रतिकांचा मृत्यू होतो. मग त्या प्रतिकांचे बाह्य रूप कायम राहते पण त्याद्वारे मानवी मनांना होणारे आवाहन मात्र होत नाही.

प्रतिके ही मूर्ती, प्रतिमा, तसबिरी, नावे, घोषणा, चित्रे, अक्षरे, शब्द, ग्रंथ, गावे; अशी अनेक प्रकारची असू शकतात. मृत प्रतिकांना कवटाळून राहणे हे शवाला कवटाळण्यासारखेच असते. प्रतिकांना शिरोधार्य मानणाऱ्या व्यक्ती वा समूहाचे चरित्र आणि चारित्र्य हाच मूळ गाभा असतो. त्याकडे दुर्लक्ष झाल्यास प्रतिके अर्थहीन होतात.

- श्रीपाद कोठे

बुधवार, ४ मार्च २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा