मंगळवार, ८ मार्च, २०२२

संस्कार

प्रसंग पुण्यातील. वेळ सकाळची. २७ वर्षांचा वकिलीची पदवी मिळवलेला आणि आयटी मध्ये काम करणारा एक युवक. बाहेर जाण्याच्या तयारीत. आंघोळ उरकून देवाला नमस्कार करून घरातल्या वडील माणसांना नमस्कार करतो. त्याचवेळी घरकामासाठी असलेल्या बाई झाडझूड करीत असतात. युवक त्यांनादेखील अन्य वडिलधाऱ्या माणसांप्रमाणेच वाकून नमस्कार करतो. कोणालाच काहीही वेगळं वाटत नाही. कामं जशीच्या तशी पुढे सुरु राहतात.

ही पोस्ट कौतुकासाठी नाही. पण लक्ष वेधण्यासाठी नक्कीच आहे. कोणत्याही गोष्टीतून शुभ-अशुभ वर्तुळं तयार होत असतात. यातूनही होतील. त्यासाठीच...

- श्रीपाद कोठे

९ मार्च २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा