मंगळवार, ८ मार्च, २०२२

सातवाहन

 - सातवाहन या ग्रंथासाठी सात ते आठ वर्षे द्यावी लागली.

- विद्वानांची भिन्न भिन्न मते.

- प्राकृत लेखांचे मराठी भाषांतर.

- राजकीय इतिहासासोबत तत्कालीन राज्यशासन, धार्मिक आर्थिक सामाजिक परिस्थिती, साहित्य, स्थापत्य, शिल्प आणि चित्रकला या विषयांचे सविस्तर विवेचन.

- वादग्रस्त प्रश्नांची चर्चा परिशिष्टात.

- आयुष्याची दोरी यमधर्माच्या हाती असते हे लक्षात ठेवून तीस वर्षे लेखन करीत आलो.

- सातवाहन ग्रंथ अभ्यासासाठी घेतला तेव्हा वय ८० होते. इंद्रिये शिथिल झाली होती. बुद्धी मात्र शाबूत होती. दीर्घ परिश्रमाचे व बुद्धिमत्तेचे कार्य ८७ व्या वर्षी परमेश्वरी कृपेने पूर्ण करू शकलो.

- उत्कीर्ण लेखांवरचे तीन ग्रंथ आधी इंग्रजीत लिहून मग मराठीत भाषांतर. सातवाहन ग्रंथ मात्र मूळ मराठीत लिहिला.

- हे काम सुरु असताना ८५ व्या वर्षी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. मुंबईचे डॉ. फडके यांनी ती केली. (प्रोस्टेट ग्रंथीची)

- डॉ. भगवानलाल इंद्रजी यांना ग्रंथ अर्पण. त्यांच्याशी काही बाबतीत सहमत होऊ शकलो नाही तरीही आघाडीचे मार्गशोधक होते.

- विदर्भ संशोधन मंडळ प्रकाशित करणार होते पण साहित्य संस्कृती मंडळानेच तो प्रकाशित केला.

- संशोधनासाठी समृद्ध ग्रंथालयांची गरज आणि त्याचा अभाव. विद्यापीठ ग्रंथालयाचा उपयोग केला.

१४ जानेवारी १९७९

लेखकाचे हृद्गत

- कोरीव लेखांची लिपी माहिती नसल्याने अडचण.

- इंग्रजी अंमल सुरु झाल्यापासून इतिहास, प्राचीन जीवन याबद्दलची स्थिती बदलली. एक म्हणजे त्यांची स्वभावतः जिज्ञासा आणि ज्या प्रजेवर राज्य करायचे तिचा इतिहास, संस्कृती यांचे ज्ञान राज्य कारभाराच्या सोयीसाठी आवश्यक.

- १७८४ मध्ये कोलकाता येथे वारेन हेस्तिंगच्या अध्यक्षतेखाली बंगालच्या एशियाटिक सोसायटीची स्थापना झाली. या चळवळीचा प्रतिसाद महाराष्ट्रातही उमटू लागला. भारतीय इतिहास, वांग्मय, संस्कृती, कला इत्यादींच्या अभ्यासासाठी इंग्लंडच्या रॉयल एशियाटिक सोसायटीची शाखा मुंबईत स्थापन झाली. त्याने या अभ्यासाला चालना मिळाली.

- रामकृष्णपंत भांडारकर, भगवानलाल इंद्रजी, ब्युव्हर.

- सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांची नाणी, नाण्यांचे संग्रह.

- कोरीव लेख आणि नाणी ही देशाच्या इतिहासज्ञानाची प्रमुख साधने होत.

- हे सगळे एकत्र करून ते कोरीव लेख प्रकाशित करण्याचा उपक्रम सुरु झाला. १८३७ मध्ये जेम्स प्रिन्सेप. त्या ग्रंथमालेला corpus inscription indicarum (latin) - भारतीय उत्कीर्ण लेख संग्रह - असं नाव देण्यात आलं.

- या मालेत दीडशे वर्षात फक्त सहा ग्रंथ प्रकाशित झाले. या सहापैकी चौथा, पाचवा आणि सहावा ग्रंथ हे म.म. वा. वि. मिराशी यांचे आहेत.

- चौथा कलचुरी - चेदी संवताचे कोरीव लेख.

- पाचवा वाकाटकांचे कोरीव लेख.

- सहावा शिलाहारांचे कोरीव लेख.


#श्रीपादचीलेखणी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा