गुरुवार, १० मार्च, २०२२

समाजाच्या पैशाचा अपव्यय

- बँका, विमा कंपन्या, वित्तीय संस्था; यांना अडचणीतून बाहेर काढणे; हा समाजाच्या पैशाचा अपव्ययच. लुटणारा लुटून घेऊन जातो. लुटीच्या प्रमाणात दोषींकडून वसुली अल्पच असते. बाकीचा पैसा अक्कलखाती जमा. उपाय? Instant उपाय काहीच नाही. एकच उपाय आहे - कर्जाची अर्थव्यवस्था संपवून बचतीची अर्थव्यवस्था विकसित करणे.

- प्रियांका गांधी यांनी एक चित्र दोन कोटी रुपयात विकणे या गोष्टीच्या राजकारणाची चर्चा तर बरीच झाली, होते आहे, होईल. पण त्यातून निर्माण होणाऱ्या आर्थिक पैलूंवर मात्र कोणी बोलत नाही. एखाद्या चित्राची किंवा अन्य कोणत्याही वस्तू वा सेवेची किंमत कशी ठरते? कशी ठरवायची? कशी ठरवायला हवी? निर्मिती मूल्य आणि विक्री मूल्य यांच्या संबंधात ग्राहक पंचायत आणि अन्यही काही संस्था आणि व्यक्ती गेली अनेक वर्षे मागणी करत असूनही त्यावर विचार मात्र होत नाही. अर्थकारणासाठी ते आवश्यक आहे.

- श्रीपाद कोठे

११ मार्च २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा