एक होणे आणि जोडले जाणे या दोन वेगळ्या बाबी. जोडण्याची अनेक कारणे, प्रयोजने, हेतू आणि पद्धती असतात. असू शकतात. एक होणे ही एक भावात्मक, abstract, गुंतागुंतीची प्रक्रिया असते. मनाचे उन्नयन, मनाची व्यापकता, बुद्धी आणि भावनांची मशागत या काही, या प्रक्रियेतील सांगण्यासारख्या आणि समजण्यासारख्या गोष्टी. अगदी दोन व्यक्तींच्या परस्पर संबंधात सुद्धा हे पाहता, जाणता अन समजून घेता येते. राष्ट्र ही अशा प्रकारची एक होण्याची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेचा प्रत्येक मागचा क्षण ही राष्ट्राची एक अवस्था असते. म्हणूनच राष्ट्र ही जाणीव भौतिक, रासायनिक लक्षणांनी बांधता येत नाही. भारताने याच पद्धतीने राष्ट्र उभारणी केली. मानवी मनाची, बुद्धीची मशागत आणि उन्नती जेवढ्या प्रमाणात आणि भूभागात केल्या गेली तेवढा भूभाग भारत म्हणून उभा झाला.
या राष्ट्र निर्माणापुढे पहिलं आव्हान उभं झालं ते सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी सिकंदर बादशहाचं, `अलेक्झांडर द ग्रेट'चे. (मुस्लिमांचे नाही.) त्याच्यापासून सुरु झालेलं हे विश्वविजयाचं खूळ इंग्रजांच्या साम्राज्याच्या पतनाशी थबकलं. विश्वविजयाच्या या प्रयत्नात जे जे प्रवाह आणि शक्ती उत्पन्न झाल्या त्यांचा सामना करण्यासाठी प्रत्येक समाजाने आपापले प्रयत्न केले. यात भारताची राष्ट्रउभारणी बाधित झाली. विश्वविजयाच्या शेवटल्या टप्प्यात ज्यावेळी हे शक्य नसल्याचं विविध शक्तींना लक्षात आलं त्यावेळी, त्या शक्तींनी व्यूहरचनात्मक पद्धतींनी जग मुठीत ठेवण्याचे प्रयत्न सुरु केले. यातूनच अनेक कृत्रिम देशांची आणि आधी लीग ऑफ नेशन्स आणि नंतर युनो यांची निर्मिती झाली. या देशांनाच `राष्ट्र' ही संज्ञा वापरण्यात आली आणि राष्ट्र म्हणजे राज्य हे समीकरण रूढ झालं. वास्तविक अमेरिका, फ्रान्स, रशिया आदी सगळ्या क्रांती या `राज्यक्रांती' होत्या, `राष्ट्रक्रांती' नव्हेत. राज्य हे जोडण्याचं साधन आहे आणि राष्ट्र ही एक होण्याची प्रक्रिया आहे याचा पुरेसा आणि पुरेशा गांभीर्याने विचार झाला नाही. या गोंधळामुळे राष्ट्र
- श्रीपाद कोठे
५ मार्च २०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा