शनिवार, १२ मार्च, २०२२

नंदा खरे आणि पुरस्कार

नंदा खरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. त्यांनी तो नाकारला. त्यासाठी कारणही दिलं. पण त्यावर विश्वास न ठेवणारेही आहेत. का नाही विश्वास? कारण त्यांना त्यांच्या मनातलं कारण हवं. आमच्या मनातलं कारण नसल्यामुळे आम्ही खरे यांच्या कारणावर विश्वास ठेवू शकत नाही. ही वृत्ती फारशी शहाणपणाची नाही एवढंच फक्त म्हणता येईल. यात खरेंचा प्रामाणिकपणा आपण नाकारत आहोत अन हे त्यांच्यावर अन्याय करणारे आहे याचंही भान राहू नये ही मनाची विचित्र अवस्था असू शकते. वर तर्कही वाचायला मिळाला की, खरे हे काही मुख्य प्रवाहातील लेखक नाहीत. त्यामुळे पुरस्कार नाकारण्यामागे वेगळे कारण असू शकते. आपल्या मनाचे खेळ एवढ्या बटबटीतपणे जगासमोर मांडताना काहीच कसे वाटत नसावे हे आश्चर्यच आहे. लेखक कुठल्या तरी प्रवाहातील असायलाच हवा का? या प्रश्नाला शहाजोगपणे नाही असे उत्तर देतीलही, पण खरे कोणत्याही प्रवाहाचे नाहीत अन त्यामुळे त्यांच्या निर्णयावर आणि त्या निर्णयामागील कारणावर प्रश्नचिन्ह लावणे योग्य नाही याचे अवधान मात्र ठेवणार नाही. बुद्धिवाद स्वतःच्या संदर्भात बुद्धी वापरायला बंदी घालतो की काय माहिती नाही.

- श्रीपाद कोठे

१३ मार्च २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा