अलीकडे वारंवार एक गोष्ट प्रकर्षाने वाटते. अनेकांना आवडणार नाही, अनेकांना सहन होणार नाही, अनेकांना वाईट वाटेल, अनेकांना राग येईल. पण ते असो. तर वाटतंय असं की, येत्या शंभरेक वर्षात भारताचं भारतीयत्व संपून जाईल. भारत हा कदाचित जगात अग्रस्थानी राहील, पण तो अन्य सगळ्या देशांमधला एक, अन्य सगळ्या देशांसारखा एक म्हणूनच. याच शे-दोनशे वर्षांच्या काळात संपूर्ण जगात दोन प्रवाह वेगवेगळ्या ठिकाणी उदयाला येतील. एक - अंतर्मुखता, व्यापकता, समावेशकता, अमूर्तता, करुणा इत्यादी मानवी software चं प्रतिनिधीत्व करेल. दुसरा - बहिर्मुखता, संकुचितता, मर्यादितता, मूर्तता, क्रूरता इत्यादीचं प्रतिनिधित्व करेल. त्यापुढील दोन-तीनशे वर्षात वेगवेगळ्या ठिकाणचे हे प्रवाह एकत्रित येण्याची आणि या दोन प्रवाहांच्या संघर्षाची असतील. यातून आजच्या जगाचा, जागतिक व्यवस्थांचा, देशांचा, जीवनाचा सगळा चेहरामोहरा, पोत बदलून जाईल. अन साधारण पाचशे वर्षांनी एक नवीन विश्व आकाराला आलेलं असेल. मी ज्योतिषी नाही. Futurologist नाही. पण असं वाटतं आहे. अन या वाटण्याच्या मुळाशी एक विचार हा आहे की, विश्वनियंत्याच्या दृष्टीने तर या जगातले सगळे लोक, सगळे देश सारखेच आहेत. त्यामुळे जीवनाच्या वाटचालीत जे जे चांगलं, योग्य असं निर्माण झालं, ते ते सगळ्यांना सामईक करण्याचा त्याचा इरादा असूच शकतो. यापुढची वाटचाल तशीच राहील.
- श्रीपाद कोठे
१२ मार्च २०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा